पाचोऱ्यात रोखला बालविवाह (व्हिडिओ)

पाचोरा नंदू शेलकर । आज होत असलेला एक बालविवाह रोखण्यात एकलव्य संघटनेसह पोलीस अधिकाऱ्यांना यश आले आहे. शहरातील भडगाव रोड येथील गोडाऊनमध्ये हा बालविवाह आयोजित करण्यात आला होता. एकलव्य संघटनेला याबाबत माहिती मिळताच पोलीसांना कळविले असून तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी धडकल्याने हा बेकायदेशीर विवाह सुरू असतानाच थांबविण्यात आला. 

दरम्यान, सर्वत्र कोरोना महामारीने लाॅकडाऊन होता. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात सर्व व्यवसाय हे मर्यादित वेळेत सुरू होते. तर लग्न समारंभावर बंदी लावण्यात आली होती. परंतु काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात निर्बधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामध्ये लग्न समारंभांना ५० वऱ्हाडीनां परवानगी देण्यात आली आहे. याचा गैर फायदा घेत, पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील गोडाऊनमध्ये एका अल्पवयीन मुलीचा आंतरजातीय बालविवाह होत असल्याचे एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांना तालुका अध्यक्ष गणेश वाघ यांनी सदर होत असलेल्या बाल विवाहाची माहिती दिली. यानंतर सुधाकर वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन संपूर्ण चौकशी केली असता चौकशी अंती सदर वधु ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. 

याबाबत सुधाकर वाघ यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन सदरचा होणार प्रकार सांगितला असता याची तात्काळ दखल घेत पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, महिला पोलिस कॉन्स्टेबल शारदा भावसार, पोलिस नाईक नरेंद्र नलावडे, दिपक सुरवाडे, किशोर पाटील, विश्वास देशमुख, योगेश पाटील यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. व पुढील होणारा आंतरजातीय बाल विवाह थांबविण्यात येवुन सदर वर व वधु पक्षाकडील मंडळींना पोलिस स्टेशनला नेवुन चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समिती, जळगांव यांचेकडे पाठविण्यात आले आहे.  एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, तालुका अध्यक्ष गणेश वाघ, धर्मा भिल, राजु सोनवणे, पिंटु भिल सह कार्यकर्तांच्या व पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेने होणारा आंतरजातीय बाल विवाह थांबविण्यात आल्याने संघटनेचे व पाचोरा पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/189583089894476

Protected Content