पाळधीत अल्पवयीन मुलीची छेड ; आरोपीच्या अटकेसाठी पोलिस स्थानकात ठिय्या (व्हीडीओ)

f572ef52 561b 48c3 bb7a cae78fcea051

 

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एका अल्पवयीन मुलीची छेडखाणी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला होता. याबाबत आज सकाळी पाळधी पोलिसात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी नागरिक ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका हायस्कूलमध्ये शिकणारी नववीची विद्यार्थिनी ही मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शाळेतून येत होती. त्यावेळी गावातीलच एका अज्ञात तरुणाने हात धरून मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने हटकले असता त्याने मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो फरार झाला. याबाबत आज गुरुवारी पीडित मुलीच्या पालकांनी पाळधी पोलिसात घेऊन गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी केली. यावेळी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. याबाबत पोलीस उपनिरीक्षक पी. बी. देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संशयित तरुणाच्या शोधार्थ पथक रवाने केले आहे. तसेच शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची देखील तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा पोलीस स्थानकात नागरिक थांबूनच होते. तर या घटनेमुळे पाळधी गावात तणावाचे वातावरण असल्याचे कळते.

 

 

Protected Content