जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचोली येथील वाकी नदीत पोहायला गेलेल्या दोन भावंडं पैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास येथे घडली. याबाबत चिंचोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.
नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचोली येथील निखिल संतोष सनांसे (वय १०वर्ष ) आणि पवन संतोष सनांसे (वय १२ वर्ष) हे आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वाकी नदीत मित्रांसह पोहायला गेले होते. मात्र, नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने निखिल हा पाण्यात बुडाला. आपला भाऊ बुडत असल्याचे पाहून पवन याने तात्काळ घरी जाऊन आई व वडील यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाइकांनी तरुणांनी नदीकडे धाव घेत काही तरुणांनी निखिलचा मृतदेह बाहेर काढला. गावातील गोपाल पाटील, सुनील घुगे, स्वप्निल वंजारी या तरुणांनी तातडीने खाजगी रिक्षाने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी निखिलला मयत घोषित केले. याबाबत पोलिसात आकस्मात मृत्यूची करण्याचे काम सुरू होते.