मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जागी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती केली आहे. रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचे मोठे योगदान आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख असल्याने एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा झटका दिल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या कक्षाला महत्त्व आले होते. गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री साहायता निधीच्या माध्यमातून रुग्णसेवा कक्षाचे काम प्रभावीपणे केले होते. देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये रामेश्वर नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी होती.
कोरोनाच्या काळात मंगेश चिवटे यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली होती. कोरोनातील कामगिरीमुळे त्यांना आरोग्यदुत म्हणत होते. त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्यावर विश्वास टाकला. मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाच्यावेळी जरांगे यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळात मंगेश चिवटे यांचा समावेश केला. मनोज जरांगेंशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळातील चेहरे प्रत्येकवेळी बदलले, पण मंगेश चिवटे कायम शिष्टमंडळात राहिले.