यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदेचे सफाई कामगारांना मुख्याधिकारी बबन तडवी यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने (दि.31) रोजी नगर परिषदच्या आवारात सकाळी सफाई कामगारांनी काळ्या फिती लावून मुख्याधिकारी तडवी यांचा तीव्र निषेध व्यक्त केला व निषेधाचे निवेदन नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक यावल यांचेकडे देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, दि. 27ऑगस्ट 2020 रोजी मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सफाई मुकादम व सफाई कर्मचारी यांना अरेरावीची भाषा बोलून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे सोमवारी सफाई मुकादम दुर्गादास चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी काळ्या फिती लावत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असुन निवेदनावर दुर्गादास चव्हाण सफाई कामगार अर्जुन बारी, दरबारसिंग पाटील, अशोक चव्हाण, अनिल चौधरी, राजेंद्र गायकवाड, मधुकर गजरे, सुनील उंबरकर यांच्या सह्या आहेत. दरम्यान या संदर्भात यावल नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी यांच्याशी संपर्क साधुन या घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी याबाबतची माहीती देतांना मुख्याधीकारी यांनी सांगीतले की नगर परिषदेचे सफाई कर्मचारी दुर्गादास चव्हाण व कार्यालयातील रोखपाल यांच्यात काही कारणाने वाद झाले असता आपण कार्यालयीन शिस्त व कामाचा भाग म्हणुन मी दोघांमध्ये समेट घडण्याचा प्रयत्न केला. कदाचीत गैरसमजीतुन हा प्रकार घडला असावा, कारण नगर परिषदमध्ये नागरी सेवा देणारे हे सर्व आमचे सहकारीच आहेत असे मला वाटते असे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सांगितले.