भुसावळात गावठी कट्टा व एयरगनसह दोन आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमिवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा व एयरगन बाळगणार्‍या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढीस लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून सागर योगेश वाघ (वय-२२ रा.सुतार गल्ली भुसावळ) व एक १६ वर्षाचा मुलगा हे भुसावळ शहरात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे ज्ञात झाले.

या अनुषंगाने या दोघांना हुडको परिसरात अटक करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्याकडे गावठी कट्टा, एयरगन आणि चाकू मिळून आला. ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,भुसावळ भाग भुसावळ व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, बाबासाहेब ठोबे, रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पो. ना. किशोर महाजन, रमण सुरळकर,समाधान पाटील, रविंद्र बिर्‍हाडे, पो का विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख यांच्या पथकाने केली.

Protected Content