प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


नागपूर (वृत्तसंस्था) मंत्रालय मुंबईत आहे, प्रत्येक सर्वसामान्याला मुंबईचा हेलपाटा मारावा लागू नये म्हणून प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. लोकांच्या अडीअडचणी असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील, काही मदत लागेल त्याबाबत तेथील कार्यालयात सांगितल्यानंतर ते कार्यालय मंत्रालयाशी ‘कनेक्ट’ असेल, तेथून थेट लोकांचे प्रश्नी मार्गी लावण्यात येतील, अशी माहितीही ठाकरे यांनी दिली. ग्रामीण भागातील लोकं मंत्रालयात मोठ्या संख्येने येत असतात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना भेटायचे कसे हा प्रश्न असतो. या लोकांना मुंबईत मंत्रालयात हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

Protected Content