नक्षलग्रस्त भागातील जवानांसोबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी !

गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त भागातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गडचिरोलीच्या दौर्‍यावर होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही नाव न घेता टोला लगावला. मला भीती असती तर मी गडचिरोलीत आलोच नसतो. मी कधीच कुणाला घाबरलो नाही. परिस्थितीला तोंड देण्याचं काम केलं म्हणून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असतो. गेल्या काही वर्षात नक्षलवाद कमी होत आहे. आपले जवान काम करत आहेत. त्यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. आपल्याला आपल्या बॉर्डरही सेफ करायच्या आहेत. या भागात पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालं आहे. हा नक्षलग्रस्त भाग आहे. मी इथे आलो आहे. ज्या परिस्थितीत आपले जवान काम करत आहेत, राज्याच्या बॉर्डरचं रक्षण करत आहेत, स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत, त्यांना सण उत्सावाचा आनंद मिळत नाही, आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कर्तव्य बजावत असतात, त्यामुळे त्यांना भेटायला आलो आहे. त्यांच्याशी बोलायला आलोय. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला आलो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

 

 

Protected Content