मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लतादीदींच्या भेटीला

cm

 

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भारतरत्न गाण कोकिळा लता मंगेशकर यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. ११ नोव्हेंबरपासून लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लतादीदींना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या ७० वर्षांपेक्षाही जास्त काळ लतादीदींनी संगीत क्षेत्रावर अधिराज्य केलं. २००१ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल.

Protected Content