मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सरकार स्थापनेच्या सर्व प्रक्रिया आणि आवश्यक नियुक्त्या पार पडल्यानंतर आता येत्या दोन दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सरकारचे जाहीर झालेले सात मंत्री एकत्रीतपणे काम करतो आहे. सगळी खाती आम्ही सात लोकं व्यवस्थितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होईल असे काही होतं नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. नुकतेच पहिले अधिवेशन पार पडले आहे. मंत्रिंमंडळाने कामकाज करायला सुरुवात केलीय. एकूणचं राज्यातील परिस्थितीची महिती घ्यायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळाची प्राथमिक बैठक रविवारी झाली असून राज्याच्या परिस्थितीचे सगळ चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरु होईल,असेही ठाकरे म्हणाले.