पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे : विजय वडेट्टीवार

shivsena and congress

 

मुंबई (वृत्तसंस्था) नवी दिल्लीत सकाळपासून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील,अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

 

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खरगे, सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक सुरु आहे. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट आहे. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात असल्याचेही स्पष्ट केले असून पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असावे अशी चर्चा असल्याची माहिती दिली आहे. राज्यात बिगरभाजप सरकार स्थापन करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमधील बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Protected Content