जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव व भुसावळ येथील विविध कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर सकाळी ११:१५ वाजेला आगमन झाले. दरम्यान,थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने धरणगावला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, महापौर सिमाताई भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले. धरणगाव येथिल जनजाती मेळाव्यास संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी हे मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमला मुख्यमंत्री फडणवीस हे प्रमुख अतिथी आहेत. यावेळी क्रांतिकारी खाजा नाईक यांना अभिवादन करण्यात येणार आहे.