बेंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला हे विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार घेऊन कुमारस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना आदेश देणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयाच्या विरोधी आहे, असे कुमारस्वामी यांनी याचिकेत म्हटले आहे. तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रालाच कुमारस्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या कामकाजाविषयी आदेश देऊ शकत नाहीत,असे कुमारस्वामी यांचे म्हणणे आहे.