मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौर्यावर असून नाशिकपासून या दौर्याची सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदा नाशिक जिल्हा दौर्यावर जातील. यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहेत. मुख्यमंत्री सर्वप्रथम त्यांचे सहकारी आमदार रमेश बोरणारे यांच्या वैजापूर मतदारसंघात येणार आहे. तिथे रॅली करून मोठी सभा घेणार आहेत.
यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन झाल्यावर प्रशासकीय बैठक ते घेणार मात्र त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील मतदार संघात रोड शो आणि सभा घेणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संदीपान भुमरे यांचं कार्यालय,आमदार संजय शिरसाट यांचं कार्यालय, आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या कार्यालयांना ते भेटी देणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या दौर्यात मुख्यमंत्री अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत, यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी बैठक होणार आहे.. यात शेतकर्यांच्या मदतीबाबत निर्णय होण्याची शक्यता सुद्धा आहे.