
भुसावळ (प्रतिनिधी) आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते आहेत. ज्यांनी जगाच्या पाठीवर भारताला एक मजबूत देश म्हणून पुढे आणले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडे येता आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी भाजपच्या मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करावी, असा टोला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना लगावला. ते आज भुसावळमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, उदयनराजे भोसले भाजपात आले तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे चर्चेला उधान आले आहे.
महा जनादेश यात्रेनिमित्त कालपासून जळगाव जिल्ह्यात दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी भुसावळात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिलीत.काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट लोक भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ कसे होतात. भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी केला होता. त्यालाही फडणवीस यांनी आज उत्तर दिले. आम्ही कुठलाही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचे डॅशिंग रसायन आहे. उदयनराजे भोसले भाजपात आले तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपात यायचे की नाही सर्वस्वी निर्णय उदयनराजे यांचाच आहे मात्र ते भाजपात आल्यास आम्हाला निश्चितपणे आनंद होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा रंगली आहे. भाजपात जायचे की नाही हा निर्णय माझ्या मनाप्रमाणे मी घेईन, असे उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारीच म्हटले होते. आता त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उदयनराजे भोसले भाजपात आले तर आनंदच होईल मात्र निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल असे म्हटले आहे. त्यामुळे आता उदयनराजे काय निर्णय घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खडसे राज्यात की केंद्रात हे वरिष्ठ नेते ठरवतील
खडसे यांना आगामी निवडणुकीत युतीची सत्ता आली तर मंत्रिमंडळात घेण्यात येईल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी गुगली टाकली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील. त्यामुळे खडसे यांना विधानसभेला उमेदवारी मिळेल का? असा प्रश्न निर्माण झालाय. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावाची चर्चा आहे.
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/510943266343587/