नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने सुनावणीस नकार दिल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सुप्रीम कोर्टाने सुनावणीस नकार दिल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळणाऱ्या दिल्ली होयकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवत चिदंबरम यांना आज (सोमवारी) मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने पी. चिदंबरम यांची याचिका सोमवारी फेटाळून लावली आहे. माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी अंतरिम जामीनासाठी यापूर्वी दिल्ली हायकोर्टात अर्ज केला होता. ती फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा चिदंबरम यांना दणका दिला. सुप्रीम कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी स्पष्ट केले की चिदंबरम यांना आधीच अटक झाली आहे. आता जुन्या अंतरिम जामीनाच्या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही. त्यामुळे, चिदंबरम यांना नव्याने नियमित जामीन याचिका दाखल करावी लागणार आहे.