चिकन उधार न देणाऱ्या विक्रेत्याला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथे उधार चिकन दिले नाही, म्हणून विक्रेत्याला दारूच्या नशेत दोन जणांना बेदाम मारहाण करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, समसोद्दिन रज्जाक खाटीक (वय-५२) रा. मनुदेवीरोड कानळदा ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चिकन व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावातील खन्ना सोपान कोळी आणि गोलू सोपान कोळी हे दोघे दारूच्या नशेत आले. यावेळी समसोद्दिन खाटीक याच्याकडे उधार चिकन मागितले. यावर खाटीक यांनी उधार चिकन देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने खन्ना कोळी आणि गोलू कोळी यांनी खाटीक यांना दारूच्या नशेत येवून शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केली. याप्रकरणी रात्री १० वाजता समसोद्दिन खाटीक यांनी जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी  खन्ना सोपान कोळी आणि गोलू सोपान कोळी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीष हारनोळ करीत आहे.

Protected Content