रायपूर प्रतिनिधी । सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आज (दि.6 जुलै) रोजी मोठे यश मिळाले आहे. आज सुरक्षा दलाने चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चाक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले असून, मृत नक्षलवाद्यांकडून तास शस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. सकाळच्या सुमारास धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. यावेळी जवानांनी हा हल्ला धैर्याने परतवून लावत चार नक्षलवाद्यांना ठार केले.