मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेसाठी छत्रपतीची ढाल पुढे करीत तिसरा उमेदवार दिला असला तरी शिवसेनेचाच उमेदवार विजयी होत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राज्यसभेच्या उमेद्वारीसाठी संभाजीराजेंची आणि फडणवीस यांची भेट झाली होती. परंतु त्यांना अपक्ष म्हणून पाठींबा न देता संभाजीराजेंना पुढे करुन कोल्हापुरातूनच तिसरा उमेदवार देण्यात आला आहे. एक प्रकारे संभाजीराजेंची ढाल पुढे करून कोल्हापूरचे माजी खा. धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले असल्याची टीका खा. संजय राऊत यांनी केली आहे.
मात्र असे असले तरी भाजपने तिसरा उमेदवार दिला असला तरी आमचे दोन्ही उमेदवार जिंकतील असा विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा आमच्याकडे आहे. सोबतच महाविकास आघाडीतील चारही उमेदवार निश्चित विजयी होतील
राज्यातच नव्हेतर देशात काँग्रेसची स्थिती पाहता फारच कमी लोकांना ते संधी देऊ शकतात. आणि कदाचित त्यांनी राष्ट्रीय स्तराचा, इतर राज्यांचा विचार करूनच बाहेरचा उमेदवार दिला आहे. शिवाय संसदेत भाजपा सरकारला प्रत्युत्तर देणारी चांगली व्यक्ती त्यांच्या नजरेत असून कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर शिवसेनेनं बोलणं योग्य नसल्याचेही खा. राऊत म्हणाले.