
नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक जिल्हयात महायुतीमध्ये मोठी बिघाडी झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात असलेल्या नांदगाव मतदार संघातून जास्त मते भारती पवार यांना मिळाले तर त्याचे श्रेय आम्हाला आणि शिवसेनेला जाणार आहे. हे श्रेय आम्हाला मिळू नये, यामुळे छगन भुजबळ तुतारीचा (राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार) प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी पक्ष जाणूनबजून तुतारी पक्ष चालवत आहेत. छगन भुजबळ महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विरोधी असलेल्या तुतारी या चिन्हाचा प्रचार व प्रसार करीत आहेत.
मंत्रीपदे महायुतीकडून घ्यायची अन् प्रचार आणि प्रसार मात्र विरोधकांचा करायचा. महायुतीचा धर्म पाळत नसाल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देवून खुशाल तुतारी वाजवावी. राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत, असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान महायुतीत खळबळ उडाली आहे.



