जळगाव (प्रतिनिधी) शहरातील युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी यांनी विविध सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची नियुक्ती अखिल भारतीय ओबीसी महासंघांच्या युवक जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे.
वैश्यवाणी युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून चेतन वाणी यांनी समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले आहे. तसेच युथ फॉर हेल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयांवर उपक्रम राबविले. देशभर ओबीसींना एकत्र करून ओबीसी समाजाच्या विकासासाठी लढा देणार्या अखिल भारतीय ओबीसी महासंघाने चेतन वाणी यांच्या कार्याची दखल घेतली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी, प्रदेशाध्यक्ष कुमार कुंभार यांच्या आदेशान्वये चेतन वाणी यांची नुकतेच जळगाव जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी दि.3 रोजी जळगावात झालेल्या बैठकीत त्यांना जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, सुषमा चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्याता आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विनोद भामरे, उपाध्यक्ष प्रकाश हिवरकर, सरचिटणीस नितीन दुसाने, संजय सपकाळ, निर्मला पवार आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.