पुणे प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यातल पिरंगुट येथील औद्योगीक वसाहतीतील कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा मृत्यू झाला असून मयतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या कंपनीत सॅझिटायझरचे उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत. तर, २० कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते. आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले आहेत.
या कंपनीत काही कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या कंपनीत अन्य केमिकल्स देखील तयार केले जातात. याच केमिकल्समुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला आहे.