भुसावळ प्रतिनिधी । इझी वॉकसह अनेक आयुर्वेदीक उत्पादनांसाठी ख्यात असणार्या अथर्व हर्बल्सतर्फे मंगळवार दिनांक २३ रोजी मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथे अस्थिरोग उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अथर्व हर्बल्सने पारंपरीक आयुर्वेदीक चिकित्सेला नवीन आयाम देऊन विविध उत्पादने बाजारपेठेत सादर केली आहेत. यात प्रामुख्याने इझी वॉक हे संधीवातावरील औषध तर असंख्य रूग्णांसाठी वरदान सिध्द झालेले आहेत. या अनुषंगाने अथर्वतर्फे मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथे अस्थिरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात भुसावळ येथील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निलेश महाजन हे रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणार आहेत. हे शिबिर बर्हाणपुरातल्या बेरी मैदानाजवळ असणार्या सिद्दीकी हॉलमध्ये आयोजित करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी डॉ. प्रवीण-९३२३३०८३६०; वसीम-८६०२५३८८७४ आणि साजीद-९८२६२५२१३० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अथर्व हर्बलविषयी
भुसावळ येथील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निलेश महाजन संचलीत अथर्व हर्बल्स या कंपनीने अल्पावधीतच विविध प्रॉडक्टच्या माध्यमातून लोकप्रियता संपादन केली आहे. पिळोदेकर अॅग्रो प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेड या आयएसओ २२०००: २००५ मानांकीत व जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)-जीएमपी प्रमाणित आयुर्वेदीक फार्ममधील औषधी वनस्पतींवर प्रक्रिया करून अथर्वने अनेक प्रॉडक्ट लाँच केले आहेत. यातील अथवे वॉक इझी या सांधेवातावर उपयुक्त असणार्या औषधाला उदंड लोकप्रियता लाभलेली आहे. तर अथर्वच्याच इम्युनिटी बुस्टर, सुपर वुमन, स्लीमर, अस्थिबंध, नीम कॅप्सुल, काम स्लीप आदी औषधेही विविध विकारांवर उपयुक्त ठरली आहेत. यातील बहुतांश औषधी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.