रावेर येथे कुटुंब अर्थसहाय्य योजनेंर्गत ३५ निराधार महिलांना धनादेश

रावेर प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत तालुक्यातील ३५ निराधार महिलांना आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी निराधार महिलांना प्रशासनाच्या माध्यमातुन आधार मिळतोय याचे समाधान असल्याची भावना तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी व्यक्त केली.

 

रावेर तालुक्यातील ३५ निराधार महीलांना आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, डॉ. सुरेश पाटील, संतोष पाटील, महेश लोखंडे आदी उपस्थित होते. सरपंच योगेश पाटील, निवासी नायब तहसीलदार सी.जी.पवार पवार उपस्थित होते. तर प्रभारी नायब तहसीलदार जी.एन. शेळकर, लिपिक योगेश मोहिते, एच. डी. कोकणी, पुरषोत्तम महाजन आदींनी परिश्रम घेतले.

कोवड संदर्भात आमदारांची बैठक

दरम्यान आमदार शिरीष चौधरी यांनी धनादेश वाटप केल्यानंतर रावेर ग्रामीण रग्णालयात भेट देवून पाहणी केली. उपाय योजने संदर्भात माहीती दिली ब्रेक-द-चैन संदर्भात आ. शिरीष चौधरी नागरीकांनी देखील शासनाला सहकार्य करण्याचे अवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले. यावेळी प्रांतधिकारी कैलास कडलग, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन आदी उपस्थित होते.

Protected Content