यावल प्रतिनिधी । राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत तालुक्यातील १२ लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्याहस्ते धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी यावलचे तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, संगांनियो विभागाच्या नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे, अव्वल कारकुन रविन्द्र मिस्त्री यांची उपस्थिती होती.
दारिद्रय रेषेखालील १२ कुटुंबप्रमुख महीला लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश प्रमाणे २ लाख ४० हजाराची मदत तहसीलदार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलीत.
लाभार्थी याप्रमाणे
सुलोचना गोकुळ सपकाळे रा. उंटावद, संगीता संतोष अडकमोल रा. दहिगाव, वंदना अशोक सोनवणे रा. किनगाव खु, ज्योती संतोष सांळुके रा. किनगाव बु, सुशिला मधुकर अढागळे रा. दहिगाव, मरूबाई सलीम तडवी रा . सावखेडासिम, रजिया महेमुद तडवी रा. सावखेडासिम, कल्पना पन्नालाल सोळंके रा. न्हावी प्र. अडावद, योगीता किशोर पाटील रा. साकळी, अलका धनसिंग कोळी रा. डांभुर्णी, शोभा युवराज सोनवणे रा. डांभुर्णी आणि आशाबाई मच्छिंद्र भालेराव रा. थोरगहाण यांचा समावेश आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/166881568706017