राज्यपालांचे अधिकार तपासा : ठाकरे गटाची मागणी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी होण्याआधीच ठाकरे गटाने एक महत्वाची मागणी केली आहे.

उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होत आहे. याआधी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी महत्वाची मागणी केली आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निकाल धक्कादायक होता. सुनावणी सुरू असताना आयोगाने निकाल द्यायला नको होता. या निकालाचा सत्तासंघर्षावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

अनिल देसाई पुढे म्हणाले की, राज्यात २१ जूनपासून ज्या घटना घडत आहेत. त्या घटनांचा क्रम सर्वोच्च न्यायालयाने तपासावा. यावर कशाप्रकारे कारवाई होऊ शकते, याकडे विशेष लक्ष द्यावे. राज्यपालांचे अधिकार देखील सर्वोच्च न्यायालयाने तपासावे. तसेच सरकार कसे स्थापन झाले, याची चौकशी न्यायालयाने करावी, असे अनिल देसाई म्हणाले.

Protected Content