जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निमखेडी शिवारात राहणाऱ्या महिलेच्या सासऱ्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयात बेकायदेशीरपणे बनावट दस्तऐवज सादर करून मालमत्ता हस्तगत करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील रहिवाशी असलेल्या श्रध्दा योगेश देसाई वय ३९ या महिला सध्या पुणे जिल्ह्यातील नांदेड येथे वास्तव्याला आहेत. त्याचे सासरे देविदास यादवराव देसाई यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या नातेवाईकांनी खोटे व बनावट मृत्यूपत्र करून मयत झालेले देवीदास देसाई यांच्या खोट्या व बनावट सह्या करून श्रध्दा देसाई आणि त्यांचा मुलांचा एकत्रीट कुटुंबाची फसवणूक केली आहे. तसेच कागदपत्र देखील संशयित आरोपींनी न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीला आल्यानंतर श्रध्दा योगेश देसाई यांनी न्यायालयात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार श्रध्दा देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी उषाबाई देवीदास देसाई वय-७०, दिपक देवीदास देसाई वय ५०, राजेश देविदास देसाई वय ४३, सर्व रा. निमखेडी शिवार,जळगाव, स्वाती मधुकर देशमुख वय ५२ रा. नाशिक, आनंदराज गोविंद पाटील रा. भडगाव, रमेश उत्तमराव पवार वय ६०, अशोक प्रभाकर पवार वय ६० आणि ॲड.कालिंदी चौधरी, जळगाव अश्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासा सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहे.