चोपडा (प्रतिनिधी ) येथील एकास शेतजमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून ३ वर्ष सक्त मजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
चोपडा येथील मोहनलाल घनश्यामदास गुजराथी यांना तालुक्यातील मामलदे येथील वनाबाई वेडू मराठे यांची शेती स्वताची असल्याची शेख अय्युब शेख युसुफ याने भासविले. तसेच त्याने सौदा पावती करून खोटा धनादेश दिला. यासंदर्भात चोपडा शहर पोलिसांत २० जुलै २०१० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानुसार ११ डिसेंबर २०१२ रोजी संशयीतास अटक करण्यात आली होती. शेख अय्युब शेख युसुफ यास न्यायालयाने ३ वर्ष सक्त मजुरी व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिन्याची सध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. हा खटला न्या. ग. दि. लांडबाळे याच्या न्यायलयात चालला सरकार पक्षातर्फे जी. बी. खिल्लारे यांनी काम पहिले.