Home क्राईम खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस ठोकल्या बेड्या

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस ठोकल्या बेड्या


crime

भुसावळ प्रतिनिधी । खूनाच्या गुन्ह्यात गेल्या आठ वर्षापासून फरार असलेला आरोपी याला जालना येथून अटक करण्यात यश आले आहे. त्याच्या विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीसात भाग 5 गुरनं 180/2011 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चुणीलाल सोबरसिंग चितोडीया असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, चुणीलाल सोबरसिंग चितोडीया वय-46, रा. भगवान नगर, अमरावती यांच्या विरोधात भुसावळी बाजारपेठ पोलीसात भाग 5 गुरनं 180/2011 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी चुणीलाल हा तेव्हापासून फरार होता. आरोपी चुणीलाल चितोडीया हा जालना येथे राहत असल्याची गुप्त माहिती भुसावळ बाजारेपठ पोलीसात मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक पंजाबराज उगले, अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी एक पथक तयार करून पोलीस निरीक्षक देवीदास पवार, पो.ना. नंदलाल परदेशी, पो.कॉ. प्रशांत चव्हाण यांच्यासह इतर डिबीचे पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound