भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेचे महत्वाचे जंक्शन असणाऱ्या भुसावळ स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी दोन नवे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहेत. यामुळे विद्यमान प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलले आहेत आणि एकूण संख्या नऊ झाली आहे.
नव्या रचनेनुसार नव्याने तयार केलेले दोन प्लॅटफॉर्म यापुढे नंबर १ व नंबर २ म्हणून ओळखले जातील. जुना प्लॅटफॉर्म क्रमांक १ आता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ म्हणून ओळखला जाणार आहे. तसेच जुना प्लॅटफॉर्म क्रमांक २ पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जुना प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आता प्लॅटफॉर्म नंबर ४ म्हणून ओळखला जाईल. जुना प्लॅटफॉर्म नंबर ४ आता प्लॅटफॉर्म ५ म्हणून ओळखला जाणार आहे. जुना प्लॅटफॉर्म क्रमांक ५ हा आता प्लॅटफॉर्म ५ ए म्हणून ओळखला जाणार आहे. जुना प्लॅटफॉर्म क्रमांक ६ मात्र यापुढेही ६ म्हणूनच ओळखला जाईल. जुना प्लॅटफॉर्म क्रमांक ७ व जुना प्लॅटफॉर्म क्रमांक ८ हे ही त्यांच्या जुन्या क्रमांकानेच ओळखले जातील. नव्याने तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवरून यापुढे नियमितपणे मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेनची वाहतूक सुरु होणार आहे. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक दोनचे काम प्रगतीपथावर आहे.