मुक्ताईनगर, प्रतिनिधी । तालुक्यातील चांगदेव येथे राहणाऱ्या प्रौढाचा शेतातील केळीच्या बागेत शिरच्छेद करून निर्घृणपणे खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, भिका दयाराम पाटील (वय-55) रा. जुनोना ता. भुसावळ ह.मु. चांगदेश ता.मुक्ताईनगर हा आपल्या परीवारासह गेल्या दीड वर्षांपासून चांगदेव येथे भाड्याच्या घरात राहत होता. चांगदेव येथील विनायक बाजीराव पाटील यांच्या कासारखेडा शेत शिवारातील शेतात भिका पाटील यांचा अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृणपणे खून केल्याचे उघडकीस आले. मृतदेहापासून धड आणि शिर वेगवेगळे करण्यात आला होता. दरम्यान हत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीसांनी धाव घेतली. पोलीसांना पंचनामा करून मृतदेहा मुक्ताईनगर ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.