चांद्रयान-२ : विक्रम लँडरचे मिळाले लोकेशन

Vikram Landers Location

वॉशिंग्टन वृत्तसंस्था । अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चांद्रयान -2 लँडर विक्रमचा ढिगारा चंद्राच्या पृष्ठभागावर सापडला आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, याचा याचा ढिगारा चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या उपग्रहात सापडला आहे. त्यामुळे विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधण्यात नासाच्या उपग्रहाला यश आले आहे. नासाने ही माहिती ट्विट व्दारे दिली आहे.

नासाच्या ल्युनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर कॅमेरानं विक्रम लँडरच्या ढिगारा शोधला आहे. नासानं याचे काही फोटो ट्विटरवर शेअर केलेत. फोटोत चंद्राच्या पृष्ठभाग दर्शवत आला आहे. ज्यात विक्रमच्या काही खाणाखुणा दिसून येत आहेत. चंद्रावरील सपाट भूमीवर उतरत असताना ज्या ठिकाणी विक्रम लँडर आदळले त्या भूमीपासून ७५० मीटर लांब अंतरावर विक्रम लँडरचे तीन अवशेष आढळले, असल्याचा दावा नासानं केला आहे. नासानं एक किलोमीटर इतक्या अंतरावरून विक्रमची छायाचित्र टिपली आहेत. या पूर्वीही विक्रम लँडरबाबत नासाने मोठा खुलासा केला होता. चांद्रयान-२ च्या विकम लँडर जेथे उतरले ती जागा शोधण्याचे काम अजून बाकी आहे, असे नासाने म्हटले होते. विक्रम लँडर हे चंद्रावर जवळजवळ आदळले आहे असे नासाने काही दिवसांपूर्वीचं म्हटले होते. मात्र, ती नेमकी जागा शोधण्याचे काम होणार असल्याचे नासाने म्हटले होते

Protected Content