चंद्रशेखर अत्तरदे यांचा मोहाडी गावात प्रचार दौरा


b2503cd3 b00b 4fce bbf6 e57daa60938b
 

जळगाव (प्रतिनिधी) अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ मोहाडी गावात आज भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.
आज सकाळी मोठ्या उत्साहात मोहाडी गावातून अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली.

 

यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी या प्रसंगी गटातील नागरिकांनी दादा आपणच विजयी व्हाल, असे आशीर्वाद दिले. यावेळी माजी कृ.उ.बा.स. सभापती लकी आण्णा उर्फ लक्ष्मण पाटील, भाजपा जळगाव तालुका अध्यक्ष संजय भोळे, शिरसोली-चिंचोरी गटातील शक्ति प्रमुख अनिल पाटील, बूथ प्रमुख पंकज तायडे, संजय सोनवणे, रोहित पवार तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.