चंद्रशेखर अत्तरदे यांचा खर्दे गावातील प्रचार दौरा उत्साहात

a401951e 8274 4456 a19f 3d0ddbe44802

 

धरणगाव (प्रतिनिधी) अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा खर्दे गावात आज दुपारी प्रचार दौरा मोठ्या उत्साहाने पार पडला.

 

यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व स्थानिक जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी जानकीराम पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तथा सरपंच बांभोरी प्र.चा. राकेश नन्नवरे, साकरे येथील सरपंच राजू कोळी तसेच लक्ष्मण गंगाराम पाटील यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच खर्दे येथील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख मोरेश्वर अत्तरदे, सचिन पाटील, बूथ प्रमुख ज्ञानेश्वर कोळी, जगदीश कोळंबे आणि गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, धिरज इंगळे, रविंद्र बावीस्कर, संदीप गोपाळ, मंगेश, लक्ष्मण सैंदाणे, विनायक भोळे, सीताराम बर्हाटे, तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content