केंद्रात पत नसल्याने खासदार रक्षा खडसे यांचे आमदारांना पत्र

 

रावेर, प्रतिनिधी । खासदार रक्षा खडसे यांनी पीक विम्याचा प्रश्न केंद्राकडे मांडावा, या मागणीसाठी आमदार असलेले देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. सत्तेतील खासदार असलेल्या खडसे एका आमदाराला प्रश्न असे सोडवण्यासाठी पत्र लिहितात. खासदार खडसे यांची केंद्रात किती पत आहे , हे यावरून दिसून येते अशी टीका आमदार शिरीष चौधरी यांनी केली.

केळी पीक विम्याचे अन्यायकारक निकष बदलावे , अन्यथा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी २६ ऑक्टोबरला बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन यांनी बैठक बोलावली होती. या सर्वपक्षीय सभेला खासदार रक्षा खडसे यांनी दांडी का मारली ? असा प्रश्न आमदार चौधरी यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्यावरही त्यांनी टीका केली. नंदकिशोर महाजन यांनी आ. चौधरी यांच्या पत्राची राज्यसरकारने दखल घेतली नाही. यावर प्रतिउत्तर देताना आ. चौधरी यांनी मी हा प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणून तो सुटावा म्हणून प्रयत्न करीत होतो असे आमदार चौधरी यांचे म्हणणे आहे. माझ्या परिने मी शेतकरी शिष्टमंडळासह शक्य होईल ते प्रयत्न प्रामाणिकपणे करत होतो. माझ्या पत्राची नोंद घेतली गेली नसती, तर मग राज्य सरकारने केंद्र सरकारशी पत्रव्यवहार अन्यथा कसा केला. २० ऑक्टोबरला ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे पालकमंत्री, कृषी मंत्री , राज्याचे मुख्यसचिव , शेतकरी प्रतिनिधी या यांच्यासोबत बैठक कशी काय झाली ? असा प्रश्न त्यांनी केला.

Protected Content