भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दीपनगर येथे कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सचिव चंद्रकांत सपकाळे सहाय्यक अभियंता या पदावरून 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज (दि.30 डिसेंबर) सेवानिवृत्त होत आहेत.
चंद्रकांत सपकाळे यांनी संघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी व सभासदांचे विविध प्रश्न सोडविले. त्याकरिता कधी मोर्चे आंदोलने पत्रव्यवहार करून प्रशासनात आपला एक दरारा कायम ठेवला होता. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक नाट्य क्षेत्रांमध्ये त्यांचे भरीव योगदान आहे. महानिर्मितीतर्फे या वर्षाच्या नाट्य स्पर्धेमध्ये त्यांनी लिहिलेले नव्या सूर्याची पहाट हे नाटक सादर करण्यात आले होते. संघटनेतर्फे त्यांना कामगार कल्याण निधी मुंबई येथे सदस्यत्व पद बहाल करण्यात आले होते. या माध्यमातून सुद्धा त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडविले. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे बहुआयामी असे आहे. संघटनेच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला असून त्यांच्या भावी वाटचालीस संघटनेतर्फे आणि कार्याध्यक्ष रोशन वाघ यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.