जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज दि.9 रोजी तालुक्यातील वराड व मुसळी गावात झंझावती प्रचारास सुरूवात करण्यात आले.
अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ दरम्यान गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करूनस्वागत केले. अत्तरदे यांच्या विजयासाठी गावकऱ्यांनी देवाकडे साकडे घातले. धरणगाव तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, वराड मुसळी गावचे सरपंच, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौऱ्याप्रसंगी जुनिअर मकरंद अनासपुरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, प्रभाकरआप्पा सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय महाजन, भाजपा शहराध्यक्ष सुनिल वाणी, भाजपा तालुका सरचिटणीस सुनिल चौधरी, धरणगाव येथील नगरसेवक गुलाब मराठे, ललित येवले, कैलास माळी सर्, सचिन पाटील, कांतीलाल माळी, भालचंद्र माळी, शरद आन्ना, राजेंद्र येवले, शिरीष आन्ना, शेखर पाटील, कन्हैय्या रायपूरकर, राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.