जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमधील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा आज कानळदा गावात झंझावाती प्रचार दौरा झाला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांची ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढली. विशेष म्हणजे अत्तरदे यांची निशाणी देखील ट्रॅक्टरच आहे.
आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कानळदा गावातून अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांची ग्रामस्थांनी ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढली. यावेळी गावातील सर्व स्तरातून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणूक गावातील विविध भागात फिरली. यावेळी गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहाराने स्वागत केले. या प्रसंगी गटातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले तसेच नागरिकांनी सदर प्रचार दौऱ्याला भरघोस प्रतिसाद दिला.
सदर दौरा माजी कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति लकी टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील तसेच जानकीराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी लक्ष्मण गंगाराम पाटील यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच आव्हाने-कानळदा शिवरातील शक्ति प्रमुख समाधान सोनवणे, गोपाल भंगाळे, बूथ प्रमुख जगदीश सोनवणे, संतोष भोई, इच्छाराम सपकाळे, मनोज न्हावकर, विनायक सोनवणे, सचिन सोनवणे, जगदीश सोनवणे, विजय सपकाळे आणि कानळदा गावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.