जळगाव जिल्ह्यात उद्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ; सतर्कतेचे आदेश

4 supertyphoon

मुंबई (वृत्तसंस्था) आयएमडी प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात दि 03 जुलै ते दि 06 जुलै या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पर्जन्य वृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे.

 

मुसळधार पर्जन्य वृष्टी लक्षात घेता त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषतः नदी नाल्याच्या काठा जवळील नागरिकांनी काळजी घ्यावी. नदी नाल्याच्या पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता असल्याने नदी पात्रात पाणी असताना आत जाऊ नये. पूर असताना नदी ओलांडू नये. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जळगाव फो.नं 0257-2223180/2217193 असा आहे. तर टोल फ्रि.क्रमांक 1077 असून अधिक माहिती साठी जि. आ. व्य. आधि. एन.पी.रावळ यांच्याशी मो.क्र. 9373789064 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content