नाशिक प्रतिनिधी । पंतप्रधान मोदींच्या सभेत एकनाथराव खडसे यांना भाषणाची संधी मिळाली नसली तरी त्यांना मिळालेले मानाचे स्थान आणि मोदींनी केलेल्या आस्थेवाईक चौकशीने त्यांचे पुनर्वसन होणार का ? या चर्चेला उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नाशिक येथे महाजनादेश यात्रेची सांगता झाली. यात एकनाथराव खडसे यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. मोदींनी आगमन झाल्यानंतर काय एकनाथ महाराज असे म्हणत त्यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी पंतप्रधानांची देहबोली ही अतिशय सकारात्मक वाटत होती. यामुळे आता आगामी काळात एकनाथराव खडसे यांचे पुनर्वसन केले जाईल का ? ही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महाजनादेश यात्रेत खडसेंना भाषण करण्याची संधी मिळाली नसल्याची बाब पाहता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.