मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात ९ मे ते १५ मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्रात तीव्र तापमान असल्यामुळे हवेचे जोडक्षेत्र तयार होत आहे. मध्य महाराष्ट्र ९ मे पासून पुढील दोन ते तीन दिवस पुणे, अहमदनगर, दक्षिण सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होईल. तसेच दिवसाचे तापमान जास्त राहिल. 10 मे ते 17 मे पर्यंत काही भागात स्थानिक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता विजय जायभावे यांनी वर्तवली आहे.
मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धराशिव भागात जोरदार वळिव पाऊस होण्याची शक्यता विजय जायभावे यांनी व्यक्त केली आहे. 10 मे पासून ते 16 मे पर्यंत अनेक भागात पाऊस सरु राहील. १६ ते १७ मे या काळात देखील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील एक आठवडा नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि अकोल्यात तीव्र तापमान वाढ कायम राहील. तसेच काही ठिकाणी पावसाचा जोर देखील पाहायला मिळेल. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ होणार आहे. ही माहिती हवामान अभ्यासक विजय जयभावे यांनी दिली आहे.
राज्यात ९ मे ते १५ मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता
8 months ago
No Comments