फैजपूर प्रतिनिधी । रावेर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे चलो पंचायत या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे.
येथील आठवडे बाजारात यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी, तर जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्नवर खान, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव डॉ.शोएब पटेल, जळगाव शहराध्यक्ष मुक्तदीर देशमुख, अलीम शेख, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, फैजपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद कौसर, शेख वसीम जनाब, मुदस्सर नजर शेख, प्रा.वहीदुजमा, शेख रियाज, शेखर तायडे, जिल्हा सरचिटणीस रामराव मोरे, नरेंद्र नारखेडे, बबन तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता असून महागाईने जनता त्रस्त, तर बेरोजगारीमुळे युवकांमध्ये सरकारबद्दल चिड आहे. जीएसटी आणि नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणसाचे प्रचंड हाल झाले. अनेकांचा रोजगार बुडाला. भाजपच्या या धोरणांविरुद्ध काँग्रेसने चलो पंचायत अभियान हाती घेतल्याचे ते म्हणाले.