चाळीसगाव प्रतिनिधी । रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट झोन द्वारा आयोजित शहरातील एस.एम.अग्रवाल कॉलेज येथे ‘रोटरी झोनल ग्रॅड मास्टर स्पार्क बुद्धिबळ स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. विविध शाळेतील १५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्य सल्लागार डॉ. हरीश दवे यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नारायणदास अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सहाय्यक प्रांतपाल राहुल कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ संदिप देशमुख, रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगांवचे अध्यक्ष डॉ भूषण मगर, रोटरी मिल्कसिटीचे अध्यक्ष दिनेश ठक्कर, रोटरी मिलेनियमचे अध्यक्ष संदीप जैन आदी मान्यवर तसेच पालक उपस्थित होते. ही बुद्धिबळ स्पर्धा ६ ते १२ व १२ ते १६ तसेच १६ वर्षापुढील अशा तीन वयोगटात घेण्यात आली.
बुद्धिबळ स्पर्धेमुळे मुलांच्या बुद्धिमतेत निश्चितच वाढ होत असून या खेळामुळे समरणशक्ती वाढणार असल्याने अभ्यासात सुद्धा प्रगती होणार आहे. बुद्धिबळ हा खेळ शांतपणे खेळण्याचा असून चाली सुद्धा योग्य पद्धतीने खेळणे आवश्यक असते असे नारायणदास अग्रवाल यांनी सांगितले. प्रतिस्पर्ध्याचे मन ओळखण्याची ताकद या खेळामुळे प्राप्त होत असते व तो पुढची चाल काय करणार आहे याचे ज्ञान प्राप्त झाल्याने या खेळात प्राविण्य मिळवता येऊ शकते असे प्रतिपादन सचिन गोरे यांनी व्यक्त केले.
बक्षीस वितरण अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी १२ वर्षीय गटातून प्रथम वेदांत राजपूत, द्वितीय नाविन्या नेरकर, तृतीय वैभव धनगर यांनी मिळवला. १६ वर्षीय गटातून प्रथम वैभव पाटील, द्वितीय प्रतिक परदेशी व तृतीय क्रमांक ओम चौधरी यांनी मिळविल. १६ वर्षे पुढील वयोगटातून प्रथम ललित पाटील, द्वितीय सिध्दांत जाधव तर तृतीय पलक यांनी मिळविला. स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा हौशी बुद्धिबळ संघटनेचे सचिव जे पी वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले. अभिषेक जाधव, धीरज जाधव (पाचोरा) यांनी मुख्य परीक्षक म्हणून तर ॲड.भूषण एडके, हेमंत चोरडिया यांनी सहाय्यक परीक्षक म्हणून काम पाहिले.
याप्रसंगी रोटरॅक्ट प्रांत सचिव हेमांगी महाजन, समकीत छाजेड, प्रशांत कोतकर, रोशन ताथेड, बाळासाहेब राणा, डॉ.बाळकृष्ण पाटील, डॉ.गजेंद्र अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते. बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख गणेश बागड, प्रकल्प आर्किटेक्ट बाळासाहेब सोनवणे, प्रितेश कटारिया, निलेश कोटेचा, सहाय्यक प्रकल्प प्रमुख केतनशेठ बुंदेलखंडी, महेश महाजन, आधार महाले, भास्कर पाटील, अतुल शिरसमाणे, विनोद बोरा यांनी परीश्रम घेतले.