चाळीसगाव प्रतिनिधी | येथील न्यायालयाच्या समोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, अतूल साईदास राठोड (वय-२१ रा. करगाव तांडा क्र. ३ ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी वास्तव्यास असून चाळीसगाव येथील दिवानी व सत्र न्यायालयात केसेस संदर्भात काम असल्याने १४ जूलै रोजी सकाळी ११:३० वा. आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच.१९ डीसी २५४५) आला होता. दरम्यान न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांनी दुचाकी कोर्टाच्या मुख्य गेटच्या बाजूला रोडच्या कडेला उभी करून मध्ये निघून गेला. कोर्टामधील काम आटोपल्यानंतर तो दुपारी तीन वाजताच्या सुमारास मोटारसायकल लावलेल्या मुळ ठिकाणी आला असता त्याला दुचाकी दिसून आली नाही. त्यावर त्यांनी रेल्वे स्थानक, बस स्थानक, भडगाव रोड, हिरापूर रोड आदी ठिकाणी शोधाशोध केली. परंतु दुचाकी मिळून आले नाही.
या अनुषंगाने हिरो एच. डिलेक्स कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने अतूल साईदास राठोड यांनी शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.