पिलखोड येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिलखोड येथे अवैध वाळूचा उपसा करून वाहून नेणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. याच्या विरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली असून याच्या अंतर्गत पिलखोड येथे कारवाई करण्यात आली आहे. येतील शांताराम पाटील हे ट्रॅक्टरमधून अवैध वाळू उपसा करून याची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांचे ट्रॅक्टर जप्त करून कारवाई करण्यात आली.

ही कारवाई सपोनी,विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद शिंदे ,योगेश बोडखे ,योगेश माडोळे,गोरख चकोर,शैलेश माळी,निलेश लोहार,जितू परदेशी यांच्या पथकाने केली. जप्त केलेले ट्रॅक्टर पोलीस स्थानकात जमा करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: