चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एका वकिलास जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्या वृध्दाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चाळीसगाव येथील न्यायालयाच्या आवारात एका वृध्दाने वकिलास जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडालेली आहे. ऍड. सुभाष खैरनार यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना, चाळीसगाव न्यायालयाच्या आवारात मंगळवारी सकाळी घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी करजगाव येथील किसन मोतीराम सांगळे (वय ७६ ) यांना अटक केली आहे.
दरम्यान, किसन सांगळे यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयिताला न्यायालयाने वकील घेण्याची सूचना केली. मात्र, सांगळे यांनी त्यास नकार दिला. आपण स्वत: केस लढवणार असल्याची माहिती त्यांनी न्यायालयास दिली आहे.