Home क्राईम चाळीसगाव हादरले! : दिव्यांग बालिकेवर वृद्ध नराधमाकडून अत्याचार !

चाळीसगाव हादरले! : दिव्यांग बालिकेवर वृद्ध नराधमाकडून अत्याचार !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. वडाळी गावातील एका ७५ वर्षीय वृद्धाने १४ वर्षीय दिव्यांग बालिकेवर राहत्या घरात घुसून बलात्कार केल्याची अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास १४ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी ही दिव्यांग असून घटनेच्या वेळी ती घरात एकटी असताना संशयित आरोपी युवराज रुपसिंग चव्हाण (वय ७५, रा. हिंगोणे, ता. चाळीसगाव) याने तिच्या घरात प्रवेश केला.

आरोपीने पीडितेची असहायता पाहून तिच्याशी अश्लील चाळे केले आणि तिचे लैंगिक शोषण केले.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय ३५ वर्षे) चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound