चाळीसगाव (प्रतिनिधी ) येथून सालाबाद प्रमाणे शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीचे आज चाळीसगाव शहरातून मिरवणुकीने शिर्डीकडे प्रस्थान झाले. चाळीसगाव येथून निघणाऱ्या या साई पालखीचे यंदाचे हे सोळावे वर्ष असून गेल्या 16 वर्षांपासून अखंडितपणे ही साई पालखी चाळीसगाव ते शिर्डी जात असते.
शहरातून निघालेल्या साई पालखीत भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. दरम्यान, येत्या रामनवमीला सकाळी ही पालखी शिर्डी येथे पोहोचून सर्व साई भक्त साईबाबांचे दर्शन घेतील असे पालखीचे अध्यक्ष प्रदीप घोडके यांनी लाईव्ह ट्रेन्ड बरोबर बोलतांंना सांगितले आहे. या पालखीमध्ये लोकनायक महेंद्र सिंग राजपूत सामाजिक मंडळा तर्फे साई भक्तांना पाण्याची व्यवस्था केली जाते तर पालखीमध्ये प्रमुख व्यवस्था पाहण्यासाठी प्रवीण राजपूत, प्रदीप राजपूत, टोनू राजपूत, उदय परदेशी, प्रेमसिंग राजपूत, संजय राजपूत आदी पाहतात. शिर्डी येथे मोजक्या गणल्या जाणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये चाळीसगावच्या या पालखीचा समावेश आहे.