चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शहर पोलीस रात्री एकच्या सुमारास गस्तीवर असताना भरधाव वेगाने जाणार्या पिकअपला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. व अधिक तपास केला असता सदर वाहन चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिस स्थानकात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शहरातील मालेगाव रोड लगतच्या एका पेट्रोल पंपाजवळ रात्री एकच्या सुमारास शहर पोलीस गस्त घालीत होते. अशात मालेगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगाने एक पिकअप येत होती. त्याला गस्तीवरील पोना अमृत पाटील, पोकॉं विजय पाटील यांनी सदर वाहन चालकास पिकअफ थांबविण्याचा इशारा केला. परंतु त्याने पिकअप वाहन न थांबविता त्याच वेगाने पिकअप हे चाळीसगाव शहराकडे चालवित नेले. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला हॉटेल आशिष गार्डन समोर पकडले. याबाबत पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता सदर पिकअप चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला त्याचे नाव विचारले असता शेख फरान शेख आरीफ (वय -२२ वर्ष) रा. अक्सा कॉलनी, हाजरा मस्जिद जवळ मालेगाव ता. मालेगाव जि. नाशिक, असे सांगितले.
याप्रकरणी सदर इसमादिरुध्द पोकॉं विजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. व आरोपीताचे ताब्यात मिळालेले वाहन जप्त करण्यात आले असून ताब्यात असलेल्या ५ लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची पिकअप वाहन हे छावणी पो.स्टे. मालेगाव जि. नाशिक ग्रामीण कडील गुरनं. २८२/ २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले असल्याचे गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा सखोल तपास पोहेकॉ राहुल सोनवणे व पोकों ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केले आहे.
सदर कारवाई एम. राजकुमार, पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या आदेशाने, रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव व अभयसिंग देशमुख, सहायक पोलीस अधिक्षक तसेच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना अमृत पाटील, पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोकों विजय पाटील, पोकों आशुतोष सोनवणे, पोकों रविंद्र बच्छे, पोकों पवन पाटील, मोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकों ज्ञानेश्वर पाटोळे, पोकों समाधान पाटील, पोकों राकेश महाजन आदींनी केली आहे.