Home Cities चाळीसगाव पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली

पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली

0
36

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक के. के. पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या निर्देशानुसार अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी लेखी आदेश जारी करत चाळीसगाव पोलीस स्थानकात कार्यरत निरिक्षक के. के. पाटील यांची जळगाव येथे नियंत्रण कक्षात बदलीचे आदेश दिले आहेत. दरम्या या संदर्भात पुढील आदेशापर्यंत चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे सोपवण्यात आला.

काही दिवसांपूर्वी शहरात एका कीर्तनाच्या कार्यक्रमात नारदाच्या गादीवर पाय ठेवल्याच्या घटनेमुळे पोलिस निरीक्षक के.के. पाटील चर्चेत आले होते. या प्रकरणी त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती.


Protected Content

Play sound